
कर्तव्यदक्ष मुलाने केली नियम मोडणाऱ्या आईवर कारवाई!
राज्यातील वाढती रूग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना संक्रमण थांबले पाहिजे अशा हेतूने १५ मे पर्यंत कडक निर्बंध राज्य सरकारने लागू केले आहेत. सकाळी ७-११ याच वेळेत किराणा दुकाने, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री साठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियमांचे पालन नागरिकांकडून होत नाही. नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून प्रशासन जबाबदारीने काम करत आहे. जे कोणी नियमांचे पालन करत नाही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
पालिका प्रशासाकडून पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई होताना दिसून येत आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घटना चांगलीच चर्चेचा विषय बनल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर भाजीपाला विक्री साठी मनाई असताना रशीद यांची आई भाजीपाला विक्री साठी बसली होती. अशा वेळी नगरपालिकेने कारवाई केली त्या वेळी पालिका कर्मचारी रशीद यांनी स्वतः कारवाई मध्ये लक्ष देत आपल्या आईचा भाजीपाला, गाडी घंटा गाडी मध्ये टाकून कारवाई केली.
आपल्या कौटुंबिक नात्याच्या पेक्षा आपल्या कर्तव्याला न्याय देण्याचे काम केल्याने रशीद शेख यांनी केल्याने सगळीकडे कौतुक होते आहे. स्वतः तहसीलदार,मुख्याधिकारी यांनी ही रशीदच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले आहे. रशीद शेख यांचा प्रामाणिक काम करतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.