
कोरोनाच्या काळात टोपेंनी राज्यातील जनतेची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली; केंद्रीय मंत्र्यांचे गौरवोद्गार
महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता पहिल्या लाटेमध्ये जितक्या यशस्वीरित्या कोणाला रोखले तेवढ्याच कौशल्याने दुसऱ्या लाटेत सुद्धा कोरोनाने थैमान घातले असताना सुध्दा यशस्वीरित्या रोखले. मुंबईमधील धारावी पॅटर्न जगभरामध्ये नावाजला गेला या सर्व गोष्टींचे श्रेय महाराष्ट्र सरकारला आणि आरोग्यमंत्र्यांना जाते. आपली आई गेल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा तितक्याच तन्मयतेने सक्रिय आहोत कोरोना रोखण्यासाठी राजेश टोपे सक्रिय झाले होते. आजही त्यांच्या कार्याचे कौतुक महाराष्ट्रभरात केले जाते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्याचं कौतुक होत आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील टोपे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
‘सन्मान देवदूतांचा’ हा विशेष कार्यक्रम मुंबई मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात कोरोनायोद्ध्यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती होती. यावेळी आठवले बोलत होते.
करोना काळात आरोग्यमंत्री टोपेंनी उत्तम काम केलं. घरच्या कुटुंबाप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेतली. विरोधक असलेल्या भाजपनेही करोना काळात टोपेंवर कधी टीका केली नाही असे आठवले म्हणाले. सोबत कविते मध्ये ते म्हणाले की ‘कोरोनाच्या काळात आरोग्य खातं चालवणे नव्हते सोपे, पण त्याला पुरुन उरले राजेश टोपे.’ अशी कविता म्हणत आरोग्यमंत्र्यांचं कौतुक केलं. आरोग्यमंत्री म्हणून टोपेंनी खूप उत्तम काम केल्याचे आठवलेंनी नमूद केलं.