त्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली शरद पवारांची आठवण; जाणून घ्या काय होतं कारण!

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटण्यासाठी गेले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही भेट घेतली आहे. या भेटीमध्ये नरेंद्र मोदींची विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला या भेटी मध्ये निवेदन सुद्धा दिले आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली तसेच या भेटीबद्दल त्यांनी माहिती दिली.

हाती आलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया मुंबईत झाली होती. त्यामुळेच पीएम मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शरद पवारांची प्रकृती आता कशी आहे अशी अजित पवारांकडे पंतप्रधानांनी विचारणा केली. शरद पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे ना? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना विचारला. यावर अजित पवारांनी म्हटलं, होय तब्येत व्यवस्थित आहे.

या भेटी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांशी मराठा आरक्षणासह 12 मुद्द्यांवर चर्चा करुन निवेदन सुद्धा दिले. या भेटीची चर्चा सगळीकडे जोमाने सुरू आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.