
वाढत वजन ही समस्या स्त्री आणि पुरुष दोन्हीत आढळते. वजन वाढल्याने शरीर तर बेढब दिसतेच परंतु आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. वाढलेली चरबी कोलेस्ट्रॉल निर्माण करते. तसेच हालचालीत मंदपणा, आळस, चालताना होणारी दमछाक यामुळे वाढलेल वजन समस्या बनते. वाढलेल्या वजनामुळे शुगर किंवा ब्लड प्रेशर यांची समस्या उद्भवते. या सर्व समस्यांचे मूळ आपला आहार तसेच जीवनशैली असून आहार सकस तसेच फॅटफ्री असावा तसेच किमान चालण्याचा व्यायाम करावा. या सर्वांबरोबर आपण आज एक घरगुती नुस्का बघणार आहोत ज्याने वजन कमी होण्यास मदत होते.
साहित्य :
१) ओवा – छोटे ३ चमचे
२) जीरे – छोटे चमचे ३
३) बडीशेप – ३ छोटे चमचे
४) काळ मीठ – १ छोटा चमचा
कृती :
ओवा, जिरे, बडीशेप, तव्यावर खमंग भाजून घ्या किमान ५ मिनिटे भाजून घ्या. भाजलेले मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक पूड करून घ्या. आता ही पूड रोज सकाळी अनुशापोटी गरम पाण्यात पाव चमचा काळ मीठ घालून ढवळून घाला व प्या.
हा उपाय किमान ३० दिवस करा निश्चितच तुम्हाला फायदा होतो. पहिल्या १० दिवसातच चरबी उतरल्याचे संकेत जाणवू लागतात. वरील उपाय आवडल्यास रिप्लाय नक्की द्या.