
मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ब्लॅक टि म्हणजेच काळा चहा पिण्याचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात.जर तुम्ही रोज ब्लॅक टि किंवा कोरा चहा पीत असाल तर तुमच हार्दिक अभिनंदन.तुम्ही आरोग्याच्या दृष्टीन अतिशय योग्य चहा पित आहात.ब्लॅक टि पिण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.ब्लॅक टि मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.चला तर मग ब्लॅक टि किंवा काळा चहा पिण्याचे फायदे आणि कोणते ६ रोग आपल्यापासून दूर राहतात ते पाहूया.
१) ब्लॅक टि पिणार्या व्यक्तींचा मेंदू तल्लख राहतो.याच प्रमुख कारण म्हणजे कोरा चहा पिल्याने आपल्या मेंदूला चांगला रक्त पुरवठा होतो,ब्लड फ्लो वाढतो.परिणामी मेंदूच्या पेशी स्वस्थ राहतात.या सर्वांमुळे तुमची स्मरणशक्ती वाढते.बौध्दिक थकवा आणणारे काम करणार्या व्यक्तींनी आवर्जून ब्लॅक टि प्यावा.ज्या व्यक्तींना सातत्यान स्ट्रेस किंवा ताणतणाव जाणवतात त्यांनी कोरा चहा नक्की ट्राय करावा.ब्लॅक टि तुमचा स्ट्रेस दूर करतो.
२) आजकाल कॅन्सरचे रुग्ण वाढले असून सेलिब्रेटीजमध्येसुध्दा हा रोग पसरलेला आहे.कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी काही पदार्थ आपण आहारात घेतले पाहिजेत त्यापैकी एक आहे काळा चहा.हा चहा नियमित पिल्याने बरेचसे कॅन्सर तुमच्यापासून दूर राहू शकतात.जसे की तोंडाचा कॅन्सर,ब्रेस्ट कॅन्सर,गर्भाशयाचा कॅन्सर,लंग्ज कॅन्सर इ टाळता येऊ शकतात.
३)ब्लॅक टि पिण्याचा सर्वात मोठा फायदा आपल्या ह्रदयाला होतो.जर तुमचे कोलेस्ट्राॅल वाढलेले असेल तर कोरा चहा प्यावा,कारण काळ्या चहात फ्लेवनाॅड्सचे प्रमाण खुप असते यामुळे रक्तातील कोलेस्ट्राॅलचे प्रमाण कमी होते व रक्त गोठण्याची क्रिया मंदावते.त्यामुळे आपल्या धमन्या निरोगी राहतात.परिणामी हार्ट अॅटॅक टाळता येतो.
४) पचनाशी संबंधित जर गॅस,अॅसिडीटी असेल तर कोरा चहा प्या.निश्चितच फरक पडेल.पोटदुखी असेल तर काळा चहा थोडा जास्त उकळून पिल्यास पोटदुखीही १०ते १५ मिनिटात थांबून जाईल.डिसेंट्री,अतिसार झाले असल्यास काळा चहा पिल्यास तो उपयोगी ठरतो.
५) त्वचेशी संबंधित आजार असल्यास जसे सुरकुत्या पडल्या असल्यास योगासन व प्राणायामासोबत कोरा चहा पिल्यास सुरकुत्यांच प्रमाण कमी होते.काळ्या चहात अँटी आॅक्सींडंट असल्याने त्वचेशी संबंधित कर्करोगावरही काळा चहा उपयुक्त ठरू शकतो.
६) वजन वाढले असल्यास काळा चहा प्या.काळा चहा पिल्यान शरीराचा मेटाबॉलीझम किंवा चयापचय क्रियेचा वेग वाढतो.परिणामी अन्नाच नीट पचन होत तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉलही कमी होतो.त्यामुळे तुमच वजन कमी होण्यास मदत होते.
मित्रांनो हा घरगुती सोपा उपाय नक्की ट्राय करा.