आयुष मंत्रालयाने सिध्द केलेला काढा

0

भारतीय आयुष मंत्रालयाने काही काढे व्हायरल इन्फेक्शनवर गुणकारी म्हणून सिध्द कलेले आहेत त्यातीलच हा एक काढा आहे. हा काढा प्रतिकारशक्ती वाढवतो तसेच व्हायरल इन्फेक्शनमध्ये आराम देतो. सर्दी, खोकला, ताप दूर करतो. पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यात हमखास भिजण आणि त्यामुळे थंडी होण तसेच सर्दी, खोकला होण यांमुळे प्रतिकारशक्ती कमी होते यासाठी हा काढा उपयुक्त आहे.

साहित्य :
१) पाणी – ३ कप
२) लवंग – ४
३) काळे मिरे – ५ ते ६
४) ओवा – १ चमचा
५) दालचिनी – छोटा तुकडा
६) तेजपान – २
७) तुळशीची पाने – ८ ते ९
८) आल – २ इंच
९) हळद – अर्धा चमचा
१०) गूळ – २ चमचे
कृती :
गॅसवर मंद आचेवर तीन कप पाणी गरम करत ठेवावे व त्यात लवंग, काळे मिरे, दालचिनी, आल खलबत्त्यात कुटून घालावे. आता तुळशीची पाने, तेजपान, हळद, गूळ घाला. काढा झाकून १०मिनिटे मंद आचेवर उकळा. गरम असतानाच काढा गाळून घ्या १ग्लास मोठ्या माणसांसाठी तर पाव छोटा ग्लास लहान मुलांना द्या.काढा गरम गरमच घसा शेकत प्या.

वरील काढा इम्युनिटी पावर वाढवतो तसेच सर्दी, खोकला, ताप यांपासून बचाव करतो. हा काढा ४ ते ५ दिवस दिवसातून २ ते ३ वेळा घ्यायचा आहे. सकाळी, दुपारी, रात्री याप्रमाणे घ्या.सकाळी केलेला काढा दिवसभर प्रतयेकवेळी गरम करून घ्या.दुसरे दिवशी नवा काढा करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.