
‘काळजी नसावी, महाराज निभावुन नेतील’ दुखापतीनंतर डॉ अमोल कोल्हेची भावनिक पोस्ट
भाषेमध्ये सध्या ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांची चांगलीच चलती आहे शिवाजी महाराज म्हणले की उभ्या महाराष्ट्रामध्ये मोठा वर्ग त्यांचे कर्तृत्व पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसलेला असतो शिवरायांच्या कर्तृत्वाचे गारुड आज ही मराठी माणसाच्या मनावर तितकेच ताजे आहे. मराठी मध्ये शिवाजी महाराजांची भूमिका म्हणले की डोळ्या समोर प्रथम डॉ. अमोल कोल्हे या अभिनेत्यांचे नाव समोर येते.
https://www.instagram.com/tv/CQh8Cowp7Ck/?utm_source=ig_web_copy_link
खा. डॉ अमोल कोल्हे हे सध्या सोनी मराठी या वाहिनीवर सुरु असलेल्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र साकारत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान डॉक्टर अमोल कोल्हे यांना दुखापत झाली होती यासंबंधी त्यांनी इंस्टाग्राम वरती पोस्ट करून माहिती दिली होती. महाराष्ट्र भरामधून चाहत्यांनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली होती. लोकांचे हे प्रेम पाहून अमोल कोल्हे यांनी केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये अमोल कोल्हे म्हणतात “काळजी नसावी महाराज निभावून नेतील”.
या वाक्याची गंमत असे दुखापती विषय केलेल्या पोस्ट वरती एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली की ‘छत्रपती शिवाजी महाराज सगळं निभावुन नेतील’. या प्रतिक्रियेने अमोल कोल्हे चांगलेच भारावुन गेले. आणि त्यांनी त्याच आशयाची पोस्ट करत दुखापतीविषयी अपडेट दिले आहे.