
वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी गर्दी नको, CM Fund साठी निधी द्या, अजित पवारांचं आवाहन!
महाराष्ट्राचे उमदे नेतृत्व म्हणून अजित पवार यांना ओळखले जाते. कामाच्या बाबतीत सातत्याने आग्रही राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. सातत्याने लोकोपयोगी कामे करत त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुध्दा आपल्या माणुसकीचा अनोखा वसा आणि वारसा त्यांनी जपला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी “राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
येत्या गुरुवारी 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत कार्यकर्त्यांना खर्च न करण्याचे आवाहन केले आहे. जो काही खर्च असेल तो खर्च होणारा निधी कोविडविरोधी लढ्यासाठी द्या
कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या कोविडविरोधी लढ्यासाठी द्यावा. तसेच रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.