नवीन पिढी तयार होतीय असले घाण आरोप लावू नका, विशाखा सुभेदारची हास्यजत्रा मधून एक्झीट…!

0

कोरोना काळात घराघरांमध्ये नागरिकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या मालिकेने मोठा दिलासा दिला. त्यातही अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले या जोडगोळीचे स्किट पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात.यूट्यूबवर तर याची पारायणं केली जातात. त्यापैकी विशाखा सुभेदार या अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र तिनं महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृत्त तिच्या चाहत्यांसाठी धक्का देणारं आहे.कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन, आणि हास्यजत्रा..! २०११ पाहिलं पर्व विजेता जोडी,मांगले मी..आणि आज २०२२ समीर विशाखा. मंडळी हा प्रवास खरंच सोपा नाहीय…! मी काही फार मोठी विनोदी अभिनेत्री नव्हतेच कधी, पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय करता येईल ह्याचा शोध घेणे किंवा जे लेखकाने लिहिले आहे ते उत्तमरित्या बाइंडिंग करून सादर करणे हे मात्र प्रामाणिक पणे केलं.

माझ्या सहकलाकारांच्या साथीने, आम्हा दोघांचीही काम कशी फुलतील ह्याचा विचार करीत,त्यांच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी लागणारे ट्यूनिंग ,बॉण्डिंग, केमेस्ट्री सगळं क्रिएट केलं. दर आठवड्याला मिळणाऱ्या स्किटमधील ,हर भुमिकेची १५ मिनिट गेली १० वर्ष मी जगले..! माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात सचिन मोटे, सचिन गोस्वामींचा प्रचंड मोठा वाटा आहे…! त्यांच्यामुळेच मी विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली गेले.दरवेळेस स्किट झाल्यावर किंवा होण्याआधीच टेंशन भयानक असतं. कालच्यापेक्षा चांगल करायचं, त्या टेन्शनमधून काहीकाळ बाहेर पडतेय..! (अजून दोन तीन एपिसोड दिसेन शूट झाले आहेत ते.) एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली २०य२५ दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक ५००ते १०००प्रयोगाची, किंवा मग सिरीयल मधली असो,मला ह्या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे..! इथलाही प्रवास खडतरंच असतो, सोपा नाहीच तो.

पण ना,इथे एकाच भूमिकेत राहून काही काळ प्रवास करता येतो,त्या भूमिकेबरोबर तिला न्याहाळात, तिला जपत, तिला अंजारातगोंजारात, तिला वेळ देऊन,तिच्यासोबत खेळता येत, शांत चित्ताने दिग्दर्शकाचा ‘ ओके ‘ हा शब्द कानाशी साठवून सुखाने घास घेऊन निजता येत. आत्ता हे ‘असं’ काम शांत चित्ताने करण्याची इच्छा झाली आहे..! रसिकहो आजवर तुम्ही माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलेत.त्याबद्दल खरच मनापासून आभार. आणि एक, मला दुसरं मोठ्ठ काम आलंय, मला सिरीयल फिल्म मिळालीय..हे अजून तरी काही घडलं नाहीय.. (पण पुढे नक्कीच घडेल ) म्हणून मी जत्रा सोडतेय तर असं काहीही नाही . नवीन पिढी तयार होतेय हे सहन होत नाहीय असले घाण आरोपही कोणी लावू नका. कारण पिढ्या घडायलाच हव्या…!आणि आपली एक्सिट पण ध्यानात असायलाच हवी. ‘जा आत्ता ‘असं म्हणण्यापेक्षा. ‘अर्रर्रर्रर्र ‘हे ऐकायला जास्त छान वाटतं नाही कां..! तर.. मंडळी थोडं स्किट व्यतिरिक्त काम करायचा विचार आहे. वेगळ्या धाटणीच काम करायचं आहे. मंडळी कायम लोभ असावा..!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.