
कोठेही जाऊ नका, सोबतच रहा जयंत पाटलांचे काँग्रेसला आवाहन!
महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रयोग करत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. भाजप कडे सर्वाधिक आमदार असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये या तीनही पक्षांनी भाजपला पद्धतशीर शह दिला आहे. मात्र आता काँग्रेस पक्ष स्वबळाचा चे नारे द्यायला लागला आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे.
काँग्रेस कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांना उद्देशून म्हणाले की आघाडीत आम्हीही तिसरे महत्त्वपूर्ण घटक आहोत. आम्हालाही विचारात घ्या, त्यांच्या या टोल्याला जयंत पाटील यांनी मजेदार उत्तर दिले.
जयंत पाटील म्हणले की “कॉंग्रेसमध्ये सध्या स्वबळाचे वारे जोरात वाहत आहे. यावर आम्ही काही बोलणे योग्य नाही. मनात काहीही असले तरी तुम्हाला आणि आम्हाला बरोबरच जायचे आहे. तु्म्ही कोठेही जाऊ नका आमच्या सोबतच रहा. म्हणूनच महामंडळांच्या नियुक्त्या करताना आम्ही समानता बाळगली आहे. यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आमची भुमिका असुन स्वबळाचा नारा हा तुमचाच अधिक आहे”, असा चिमटा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढला. मात्र काँग्रेसला सोबत घेण्याची स्पष्ट भूमिका, इच्छा त्यांनी बोलताना बोलून दाखवली.