ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका; मिटकरींचा पंकजा मुंडेंना सल्ला!

0

भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंत लोकांना डावलण्यात येत आहे; व इतर पक्षा मधून आलेल्या लोकांना संधी देण्यात येत आहे. यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी चांगलाच भारतीय जनता पक्षाला टोला लावत पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे.

पंकजा मुंडे सध्या नाराज असल्याचा सर्वत्र चर्चा सुरू आहेत याबाबतीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केले होते की “मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. पण मी संपलेली नाही. मी आहे. मी तुमच्या जीवावर आहे”, असं पंकजा म्हणाल्या होत्या.

यावरच भाष्य करत अमोल मिटकरी म्हणाले आहेत की “ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत.
“नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका”. अशा आशयाचे त्यांनी ट्विट करत भाजपला टोला लावत ताईंना सल्ला दिला आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.