
रविवारी चूकुनही आग्रहास्तवही खाऊ नका ही १ वस्तू खाल्ल्यास आयुष्यभर होईल पश्चाताप
आठवड्यातील रविवार हा सुट्टीचा वार म्हणून जवळजवळ सर्वच अस्थापनात सुट्टी घेतली जाते. सनडे म्हणजेच फनडे असा समज जगात सर्वच ठिकाणी रूढ आहे. परंतु रविवारला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असून हिंदू धर्मशास्त्रानुसार रविवार हा सूर्यदेवाला अर्पण केलेला आहे. अनेक लोक यादिवशी सूर्याची उपासना करतात. सकाळी सूर्याला तांब्याभर पाणी अर्पण करतात. यालाच सूर्याला अर्घ्य अर्पण करणे असे संबोधले जाते. जे व्यक्ती हे अर्घ्य नेमाने देतात त्यांच्या आयुष्यात मान, प्रतिष्ठा, संधी तसेच यश प्राप्ती होते. दररोज नियमित सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यास घरातील आजारपण दूर होऊन घरातील व्यक्तींना आरोग्य प्राप्त होते. मित्रांनो आज जाणून घेऊया कोणती कामे रविवारी करावीत व कोणती कामे रविवारी करू नयेत. कारण कळत नकळत आपण ही कामे रविवारी केल्यास आपल्या कुंडलीतील सूर्य कमजोर होऊन आपल्याला अशुभ फळे प्राप्त होतात. परंतु काही कामे आवर्जून केल्यास सूर्य उच्च किंवा मजबूत होऊन शुभ फळे प्राप्त होतात.
चला तर मग आरोग्य व धन प्राप्तीसाठी पाहुया रविवारी आवर्जून करायची कामे.
रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभरात जर एखादी गरीब, असहाय्य, रैगी, तृतीयपंथी व्यक्ती दिसली व तिने मदत मागितली तर ती जरूर करावी. अशी मदत केल्याने सूर्य मजबूत किंवा उच्च होऊन शुभ फळे मिळतात. या दिवशी सकाळी घरात पहिली चपाती व भाकरी यांपैकी जे बनेल ते गायीसाठी गोग्रास म्हणून काढून ठेवा. तसेच शक्य असेल तर रविवारी गायीची पूजा करून तिला गोग्रास द्या. या दिवशी कपाळावर लाल चंदन किंवा हरी चंदन लावणे अत्यंत शुभ समजले जाते. तसेच रविवारी उत्कृष्ट खाद्यपदार्थ बनवून त्याच सेवन करण उत्तम समजल जाते. या दिवशी कार्यसिध्दी योजून पूर्व, उत्तर किंवा आग्नेय दिशेला प्रवास केल्यास नियोजित कार्यात यश मिळते. या दिवशी नवीन स्वताच्या घरात गृहप्रवेश करणे शुभ मानले जाते. या दिवशी तुमच्या जवळ एखादी नदी, सरोवर, तलाव असेल तर त्यातील माशांना पिठाच्या गोळ्या रविवारी खाऊ घाला. या पिठाच्या गोळ्या बनवताना ऊँ नमो भगवते वासुदेवाय ईया मंत्राचा जप करावा. या दिवशी काळ्या मुंग्यांना खोबरे खिस व साखर एकत्र करून खाऊ घाला. धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. रविवारच्या दिवशी अनेकजण व्यापार उद्योगात यश मिळावे म्हणून काळ्या हळकुंडचा वापर करतात. अशा काळ्या हळकुंडाची एक जोडी किंवा एक हळकुंड घेऊन घरात किंवा व्यापार, उद्योग अथवा कामाच्या ठिकाणी कॅशबॉक्समध्ये ठेवा. असे केल्याने प्रत्येक कार्यात धनलाभ होतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार रविवारच्या दिवशी आदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ करणे उत्तम मानले जाते. यापाठाने सूर्य उच्च होऊन जीवनमान सुधारते. रविवारच्या दिवशी सूर्याची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कुंकू मिसळा व ते पाणी वडाच्या झाडाच्या बुंध्याला घाला.
आता पाहुया रविवारी कोणत्या गोष्टी करू नयेत.
रोगी, गरीब, असहाय्य, तृतीयपंथी लोकांचा अपमान करू नये. रविवारच्या दिवशी पश्चिम किंवा वायव्य दिशेला प्रवास करू नये. या दिशेला प्रवास करणे अत्यंत गरजेचे असल्यास पान खाऊन किंवा तोंडात थोडेसे तुप टाकून पाच पावले उलटे किंवा मागे चालून या दिशांना प्रवास करावा. पश्चिम दिशेला दिशाशूल असल्याने या दिशेकडे प्रवास टाळावा. या दिवशी काळा, निळा, करडा हे रंग असलेले कपडे परिधान करू नयेत. हे रंग सूर्याला अप्रिय आहेत. रविवारचे व्रत किंवा उपास करणार्या व्यक्तींनी या दिवशी मीठ खाऊ नये. हे करणे शक्य नसल्यास किमान या दिवशी एकवेळ तरी आहारात मीठ खाऊ नये. कारण याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होतो. जर तुमचा सूर्य कमजोर असेल नीच स्थानी असेल तर या दिवशी तुम्ही केस कापू नका. दिवसा सहवास करू नका. तसेच मांसाहार करू नका.
मित्रांनो हे बिनखर्ची उपाय करा आणि आम्हाला रिप्लाय द्या.