
अत्यवस्थ आजारी पतीच्या कानी रोज आवाज ऐकू यायचा ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’
जबरदस्त इच्छाशक्ती आणि असीम भक्ती यापुढे मृत्यूही झुकला
जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अनेक अशक्यप्राय कामांना पूर्ती देतो. ही इच्छाशक्ती त्याला त्याच्या अपंगत्वावरही मात करायला मदत करते. बहुतांशवेळा धडधाकट माणस अत्युच्च यश संपादन करतात, परंतु काही वेळा अपंग, लगंडी, लुळी आंधळी माणस आपल्या व्यंगावर मात करत स्वताच आयुष्य जगतात. प्रसिध्द शास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग्स याच सर्वोत्तम उदाहरण आहेत. ही इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी तुमच्याजवळ निशंक श्रध्दा असणे गरजेचे असते. स्वामींवर श्रध्दा असणार्या अनेक भक्तांना श्रध्दा आणि त्याचे सकारात्मक अनुभव घेतलेले असतील. मित्रांनो असाच एक अनुभव आपण आज बघणार आहोत.
एका शहरात एक संपन्न आणि उच्च शिक्षित कुटुंब आहे. या कुटुंबात श्रध्देने स्वामींची भक्ती केली जाते. या कुटुंबातील सासरे डॉक्टर आहेत व ते रुग्णांवर उपचार करत होते. या दरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्या संपर्कातील त्यांच्या कुटुंबालाही कोरोना संसर्ग झाला. सासू नसलेल्या या कुटुंबातील सून घरीच कोविड उपचार घेऊन कोरोना मुक्त झाली. परंतु डॉक्टर सासरे व नवरा यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अॅडमीट केल गेल. सून पती व सासरे यांना दवाखान्यात डबा नेऊन देत असे. पती व सासरे विलगीकरण केंद्रात असल्याने दोघांना भेटता येत नसे. लांबूनच ती पती व सासर्यांना बघत असे. परंतु संवाद होत नव्हता. तरीही पतीची घालमेल व त्रास तिला बघवत नव्हता. उत्तम औषधोपचार चालू असलेल्या या दोघांना निव्वळ प्रार्थनेची गरज होती. स्वामींवर अतूट श्रध्दा असलेली सून निस्सीम भक्ती करत स्वामींचा अखंड जप करत होती. या संकट काळी स्वामीच तिला आधार वाटत. रोज रात्री मानस पूजा करून ती महाराजांना सोबत चला अशी विनंती करत दवाखान्यात जात असे. पतीला आत्मबळ मिळून त्याला शांत झोप लागावी अशी विनंती ती महाराजांना करत कसे.
सुनेने औषधोपचाराबरोबर अखंड श्रध्दा व भक्ती हे व्रत अंगिकारले. तीची इच्छाशक्ती फळाला आली व पती आणि सासरे कोरोनामुक्त होऊन घरी आले. दोघांनीही श्रध्देने स्वामींचे दर्शन घेतले. पती आपल्या पत्नीला म्हणाला, “आजारान मी मनान थकलो होतो परंतु स्वामी समर्थ महाराज माझ्याजवळ येऊन मला शांत झोप भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत. गुरुदेव दत्त असा आवाज कानावर यायचा व मला झोप लागायची.” हे सर्व ऐकून पत्नीच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. तिने मनोभावे स्वामींना नमस्कार केला.
उत्तम औषधोपचार असतानाही डॉक्टर पेशंटन रिस्पाॅन्स देण महत्वाच आहे किंवा परमेश्वरावर श्रध्दा ठेवा अशी विधान करतात. श्रध्दा आणि इच्छाशक्ती जगण्याचा मार्ग दाखविते हेच खरे. ‘ हम गया नही जिंदा है ‘ हे स्वामी वचन सातत्याने अनुभूतीस येते. तुम्ही धनवान बनण्यासाठी तुमचा श्वास चालू राहण गरजेच आहे. ज्या घरात महाराजांच अस्तित्व आहे. तिथे समाधान, दया, प्रामाणिकपणा यांमुळे अनेक संकटे निर्विघ्न पार पडतात.