या तीन दिवशी चुकूनही तोडू नका तुळस, बेल आणि दुर्वा

0

हिंदू धर्मात आराध्य देवतेची पूजा श्रध्दा आणि परंपरेचा भाग आहे. रोज सकाळी स्नान करून देवपूजा केली जाते. देवाला चंदन तसेच निरनिराळी फूल वाहिली जातात. फूलांबरोबरच देवाला तुळस, बेल, दुर्वा वाहिल्या जातात. तुळस भगवान पांडुरंगाला वाहिली जाते, भगवंताच्या गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. बिल्व किंवा बेल पत्र भगवान शंकराला किंवा महादेवाला घालतात. दुर्वा २१ देठांची जुडी करून गणपती बाप्पांना घालतात. या तीनही वनस्पतींचे आयुर्वेदिक उपयोग असून आयुर्वेदिक औषधात यांचा वापर होतो.

परमेश्वरावरील श्रध्दा व्यक्त करण्याचे निरनिराळे प्रकार असून त्याची निसर्गाशीही सांगड घातली जाते. काहीजण मांसाहार करत नाहीत, काहीजण विशिष्ट दिवशी पांढरे कपडे परिधान करतात. जप करणे, दर्शन घेणे या सर्वातून भक्तिभाव व्यक्त होत असते. अशाच काही पूर्वापार श्रध्दा असून त्याद्वारे वनस्पतींचे जतन व संवर्धन होते. तुळस, बेल, दुर्वा विशिष्ट दिवशी तोडणे निषिद्ध समजले जाते, तर कोणते दिवस आहेत हे चला पाहुया.

ज्या देवतांचा वार असेल त्या दिवशी म्हणजेच सोमवारी बेल तोडू नये, मंगळवारी दुर्वा तोडू नये, बुधवारी तुळस तोडू नये.या दिवशी या वृक्षांची पाने तोडू नयेत. बरेचदा हे नियम पाळत कठीण होते परंतु काही विशिष्ट दिवस मात्र तुम्ही आवर्जून पाळू शकता त्यापैकी अष्टमी, अमावस्या व पौर्णिमा या तीनही दिवशी या वृक्षांची पाने तोडू नयेत. तसेच १२ राशींच्या संक्रांती असतात त्या दिवशी घरात नवजात शिशू जन्माला आल्यास, कोणी मृत्यू पावल्यास या वृक्षांची पाने तोडू नयेत. भक्ती आणि श्रध्दा याचबरोबर निसर्गाच संवर्धन या उद्देशाने वृक्ष लागवड करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.