
डोळ्याने अधू ज्ञानेश्वर क्षीरसागर कॅलेंडर विकून बनला बँक अधिकारी
ज्ञानेश्वर क्षीरसागर हा दृष्टीने अधू असून त्याच्या डोळ्यांना कमी दिसत, परंतु जिद्दीच्या जोरावर त्यान त्याच्या शारीरिक व्यंगावर मात करत बँक परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.ज्ञानेश्वर क्षीरसागर याची घरची परिस्थिती बेताची असून तो चरितार्थासाठी कॅलेंडर विकत होता.दरम्यान तीन, चार वर्षांपूर्वी दृष्टिबाधित लोकांच्या आॅर्केस्ट्रात त्यान भाग घेतला होता व त्याची ओळख सोशल नेटवर्किंग फोरमशी झाली या माध्यमातून त्याला वेळोवेळी उपजिविकेसाठी मदत केली गेली.
सुरुवातीला त्याला कॅलेंडर स्टॉल लावून देण्यात आला.परंतु कोरोना साथीमुळे स्टाॅल बंद करायची वेळ त्याच्यावर आली.परंतु त्याने हार न मानता सोशल मिडियावर कॅलेंडर विक्री सुरू केली त्याला संवेदनशील लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला व कॅलेंडरची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती.ज्ञानेश्वर जिद्दी व चिकाटी असल्याने त्याने बँक परीक्षांचा अभ्यास सुरू केला.अधू डोळ्यांनीही तो संपूर्ण एकाग्रतेने अभ्यास करत राहिला.त्याच्या या प्रयत्नांना यश आल असून कॅनरा बँकेत प्रोबेशनरी आॅफिसर म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे.लेखी व मुलाखत अशा दोन्ही स्वरूपाच्या परिक्षेत त्यान यश मिळवल आहे.
प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी छसेच जिद्द या जोरावर डोळ्याने अधू असूनही ज्ञानेश्वरन हे स्थान मिळवले आहे.धडधाकट तरुणाईसाठी निश्चितच हे प्रेरक अस कृत्य आहे.