“साहेबांना उदंड आयुष्य लाभावं, राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत” अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 30 क्विंटल साखरेचे वाटप!

0

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यभरातून त्यांच्या वरती जीव ओवाळून टाकणारे हजारो कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात. आपल्या आक्रमक स्वभाव आणि कामाच्या शैलीमुळे ते सर्वांना परिचित आहेत, तितकेच त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सुध्दा सर्वांना माहीत आहेत.

जळगाव मधील अजित दादांवर प्रेम करणारे अरविंद बंगालसिंह चितोडिया हे कार्यकर्ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

 

जळगावातही अजित पवारांवर जीव ओवळणारा असाच एक कार्यकर्ता आहे. अरविंद बंगालसिंह चितोडिया असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. सध्या अरविंद चितोडिया चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या एका उपक्रमामुळे. अजित पवारांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने अजित पवारांना जनतेचे आशीर्वाद मिळून त्यांना उदंड आयुष्य लाभावेत तसेच ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अरविंद हे चक्क 30 क्विंटल साखर लोकांना घरोघरी जाऊन वाटत आहे.

या अनोख्या उपक्रमाच्या बद्दल अरविंद चितोडिया यांना विचारले असता ते म्हणाले की “उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील मुरब्बी नेते आहेत. त्यांची कार्यशैली मला भावते. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांची असते. त्यामुळे अशा नेत्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून जनतेचे आशीर्वाद मिळायला हवेत. हेच आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही लोकांना घरोघरी जाऊन साखर वाटत आहोत. साखरेने लोकांचे तोंड गोड व्हावे, अजित पवारांबद्दल त्यांच्या मनात चांगली भावना निर्माण व्हावी, म्हणून आम्ही साखर वाटप करत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून अजित पवारांना जनतेकडून चांगले आशीर्वाद मिळतील, अशी आम्हाला खात्री आहे,” असे अरविंद यांने सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.