दिलदार भरत जाधवने पोस्ट शेअर करत मांडली नवी संकल्पना

0

सोशल मिडियाचा वापर समाजातील प्रत्येक वर्ग करत असतो. सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वचजण घरात आहेत. अशावेळी सोशल मिडीया एकमेकांशी संपर्क ठेवण्यास उपयुक्त ठरतोच पण बरीचशी माहितीही सोशल मिडियावर मिळू शकते. सोशल मिडियावर मनोरंजनाबरोबरच उपयुक्त माहिती, सल्लेही मिळू शकतात. सद्यस्थितीत सोशल मिडियावर सर्वच कलाकार अॅक्टीव्ह असून कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून सोशल मिडियाकडे पाहिले जाते. अशाप्रकारे केलेल्या पोस्टमुळे लोक प्रोत्साहित तर होतातच पण सकारात्मक विचारसरणी करू लागतात. अशीच एक सकारात्मक पोस्ट भरत जाधवने शेअर केली असून कोरोनाच्या सद्यस्थितीत भरतने एक छान उपाय सुचवला आहे.

ही पोस्ट कोणाची आहे याबद्दल फारशी माहिती नाही परंतु भरत जाधवने त्रयस्थाची पोस्ट म्हणूनच ती शेअर करत मूळ लेखकाला क्रेडीट दिल आहे. भरत जाधवने स्वताच्या इन्स्टाग्राम अकौंटवर सोशल मिडियावरील ही पोस्ट कोरोना परिस्थितीवरील उत्तम उपाय म्हणून शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिलय “माझ्या सोसायटीत ४ जण कोरोना पाॅझीटिव्ह होते, बेड मिळत नव्हते. त्यात प्रत्येकाचे फ्लॅट १ बीएचके त्यांच्या घरी वृध्द पालक व इतर कुटुंबिय, त्यामुळे मी माझ्या सोसायटीतील दोन रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तेथे कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. सोसायटीतील इतर मेंबर ज्यांना शक्य असेल ते नाष्टा, जेवण औषधे देत होते. ज्यांचे रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले त्यांचा सहा महिन्याचा मेंटनन्स माफ केला. परिणामी त्यांनी मदत केली. १५ दिवसात सर्व रुग्ण बरे झाले व फ्लॅट रिकामे झाले. हेच फ्लॅट आता इर्मर्जन्सीसाठी मी राखून ठेवलेत. हा माझा छोटासा प्रयत्न. वेळ संकटाची आहे अशावेळी रिकाम्या जागेचा वापर अशा कारणासाठी व्हावा एवढीच अपेक्षा. हीच वेळ कर्तव्य करण्याची.”

भरत जाधवने सोशल मिडियावरची ही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सद्यस्थितीत सर्वच ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बेड मिळण दुरापस्त होत आहे. अशावेळी घरच्या व आपुलकीच्या माणसात राहील तर आजारपण सुसह्य होते. या अनुषंगाने भरत जाधवने ही पोस्ट केली असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे.


मित्रांनो लेख आवडल्यास आमच्या पेजला लाईक करा. लेख शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.