देवमाणूस मालिकेचा असा होणार शेवट डाॅक्टरच्या हातात पडणार बेड्या जाणूनघ्या घटना क्रम

0

मर्डर मिस्ट्री देवमाणूस ही मालिका आता अंतिम टप्प्यात असून मालिकेचे नाव देवमाणूस असले तरी मालिकेतील पात्र अतिशय थंड डोक्याचा भामटा असून अनेक तरुणींना फसवून कित्येकांचा जीव घेतो. देवमाणूस ही मालिका उत्तम टी आर पी खेचत असून कथानकातील डॉक्टरबद्दल सर्वांनाच घृणा निर्माण झाली आहे. डाॅक्टरची खोटी डिग्री मांडून व्यवसाय करणारा हा कंपाऊंडर कपटी आहे.

देवमाणूस ही मालिका सत्यघटनेवर आधारित असून मालिकेतील डॉक्टर सत्य जीवनात कराडचा संतोष पोळ हा असून २००३ साली त्याने पहिला खून सुरेखा चिकने या महिलेचा केला. त्यानंतर संतोषने त्याच्या नर्सच्या सहाय्याने अनेक निरपराध व्यक्तींचे खून केले. इतका भयानक व नकली डॉक्टर आणि त्याची नर्स दोघेही पाषाणह्रदयी व लालची होते.

मालिकेत डाॅक्टरची भूमिका किरण गायकवाड या अभिनेत्याने केली आहे. मालिकेत डॉक्टरची नर्स खून झालेल्या व्यक्तींचे संपर्क ताब्यात घेऊन त्यांना स्वता फोन करत असते व नातेवाईकांना हे लोक जीवंत असल्याचे भासवत असते. परिणामी नातेवाईकांना थोडे दिवस संशय येत नव्हता. याप्रकारे डाॅक्टर व नर्स हे दोघेच कट कारस्थान करत असतात. नर्स ज्योती कोणताही विचार न करता सर्वच बाबतीत डॉक्टरला मदत करत असल्याने बरेच काळ तपास सुरू असून पुरावे सापडत नाहीत. पुढे जाऊन डाॅक्टर नर्सबरोबर लग्न करतो परंतु तो तिचाही खून करण्याचा प्लॅन करतो. ज्योतीला हे लक्षात येताच ती पोलीसांना सर्वकाही सांगते व माफिचा साक्षीदार बनते. परिणामी डॉक्टरला अटक होऊन तो त्याचे सर्व गुन्हे कबूल करतो. मालिकेचे कथानक याप्रकारे रूप घेत मालिका संपते.

Leave A Reply

Your email address will not be published.