देवेंद्र फडणवीसांनी फ्रस्टेशनमध्ये काहीही बोलू नये हीच ईश्वचरणी प्रार्थना : महापौर किशोरी पेडणेकरयांची टीका

0

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे. मुंबई मधील कोरोना नियंत्रणात आणल्यामुळे देशभरातून कौतुक झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मात्र पालिकेवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की “एका भागात कोरोनावर नियंत्रण आणल्याने त्याचं कौतुक झालं म्हणजे संपूर्ण मुंबईचं कौतुक होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालिकेचं कौतुक केलं नाही”. या बाबतीत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आले होते.

महापौर किशोरी पेडणेकर आक्रमक होत म्हणल्या की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी असं विधानं करणं योग्य नाही. त्यांनी सार्वजनिकरित्या भाष्य केलं असेल तर यावर बोलावं लागेल असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी मुंबईला काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीने असं काही बोलणं हे महाराष्ट्राला आणि मुंबईला पटण्यासारखं नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यांनी फ्रस्टेशनमध्ये काहीही बोलू नये, तसं होऊही नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे, असा टोला पेडणेकर यांनी लगावला.

असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याला चांगलेच धारदार उत्तर त्यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.