देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे सिद्ध होतंय; नवाब मलिकांची खोचक टीका

0

तौक्ते वादळाचा फटका कोकणाला चांगलाच बसला आहे. या वादळात कोकणवासीय जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणाला मदत मिळाली पाहिजे ही राज्य सरकारने भूमिका घेतली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. पॅकेज वरून महाराष्ट्रात चांगलेच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण पेटले आहे.

“कोकणातील जनतेला नुकसानभरपाई मिळाली दिली जाणार आहे. मात्र महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल”. अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले ते पुढे म्हणाले की “फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागले आहे”, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस वेळोवेळी धारेवर धरत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी सहकार्य करणे अपेक्षित होते मात्र देवेंद्र फडणवीस राजकारण करण्यात व्यस्त होते. महाराष्ट्राला अधिकची मदत कशी मिळवून देता येईल या पेक्षा त्यांनी अधिकचे राजकारण करण्यात धन्यता मानली आहे. अशा लोकांतून प्रतिक्रिया आता यायला लागल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.