पुतण्या तन्मय फडणवीसमुळे देवेंद्र फडणवीस आले गोत्यात

0

राज्यात सध्या राजकीय शाब्दीक बाचाबाचीला उत आलेला आहे.रेमेडिसेव्हर तसेच लसीच्या तुटवड्यावरून भाजप आणि शिवसेना एकमेकांवर टिका करत आगपाखड करत आहेत.खरतर राज्यात महाविकास आघाडीच सरकार आहे परंतु एकमेकांना पाण्यात पाहण्याच काम भाजप,शिवसेना हे पक्ष करत आहेत.एकेकाळी हे पक्ष युतीत होते,मित्रपक्ष होते परंतु राजकारणात सत्तेची समिकरण बदलतील तस सर्वच बदलत असत.

नुकतीच देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिवराळ भाषेत टिका केली होती.त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी ब्रुक फार्माच्या राजेश डोकनियांची मध्यस्थी करत सुटका केली होती,त्यावरूनही त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती.सध्या मात्र फडणवीस घरगुती कारनाम्यान गोत्यात आलेत.विरोधी नेत्यांवर घराणेशाहीबाज अशी टिका केलेल्या फडणवीसांची घराणेशाही बाहेर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे तरुण पुतणे तन्मय फडणवीस यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत आणि त्याचे फोटोही सोशल मिडियावर शेअर केले आहेत.देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे ४५वर्षांवरील नसूनसुध्दा त्यांनी या दोन लसी कुठून घेतल्या? की ते ४५वर्षांवरील आहेत? अशी उपरोधिक टिका त्यांच्यावर सुरू झाली आहे.काही जणांनी तुम्ही रेमेडिसेव्हरचा साठा केलात तसा लसींचाही साठा करून ठेवला आहात का?असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान राज्यात लोक लसीकरणा अभावी खोळंबून असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबातील १८वर्षांवरील सर्व सदस्य लसीकरण करून मोकळे झाले असाही उपरोध काहीजणांनी केला आहे.तसच एकान धन्यवाद तन्मय फडणवीस तुमच्यामुळ केंद्राला १८वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्याची कल्पना सुचली अशी बोचरी टिका केलेली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.