देवेंद्र फडणवीसांना घोषणाबाजीची सवय, मध्यवर्ती निवडणुकीच्या बाबत बाळासाहेब थोरतांनी लावला टोला!

0

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते कथा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणीस सातत्याने चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असतात. अधिवेशनाच्या काळात १२ आमदारांचे १ वर्षा साठी बिलांबन झाल्याच्या नंतर काहीसे फडणवीस बॅकफूटवर गेले आहेत.

देवेंद्र फडणीस यांनी असे वक्तव्य केले होते की “मध्यवर्ती निवडणूका झाल्या तर आघाडी सरकार धाराशाई होईल ” या बद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना याबद्दल विचारले असता त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली की “‘फडणवीसांची नेहमी काही ना काही घोषणा असते पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. मध्यावर्ती निवडणुका होणार नाहीत. दोन वर्ष आघाडी सरकार चाललंय आणखी तीन वर्ष चालेल पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये”, असं विधान थोरातांनी केलंय.

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दंडकारण्य अभियानाचा वृक्ष लागवड करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे तसाच पुढील तीन वर्षाचा कालावधी सुद्धा महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.