उपमुख्यमंत्री अजित पवार शोकाकुल,बालपणीच्या कर्मचाऱ्याचे झाले दुखद निधन

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच बालपण काटेवाडी, बारामती इथ खेळण्या बागडण्यात गेल आहे.काटेवाडीच्या अनेक आठवणी आजही त्यांच्या मनात रुंजी घालत असतात.बुधवार 7 तारखेपासून मात्र अजित पवार शोकमग्न आहेत.याला कारण त्यांच बालपण साजर करणारे आणि त्यांच्या बालपणीचे साक्षीदार असलेले त्यांचे जुने कर्मचारी जालिंदर शेंडगे यांच निधन झाल आहे.

प्रत्येकाच्या मनातच बालपणीच्या काही सुखद आठवणी जपलेल्या असतात.आठवणींची ही शिदोरी आयुष्यभर कारणपरत्वे सुटत असते व त्यातून लहानपण बाहेर पडत असत.अजित पवारही याला अपवाद नसून त्यांच्याही लहानपणीच्या काही आठवणी आहेत व त्या आठवणीत जालिंदर शेंडगे सातत्यान डोकावत असतात.

जालिंदर शेंडगे अजित दादांच्या घरी कर्मचारी होते, ते लहान अजित पवारांना सायकलवरून शाळेत सोडायला जात असत.तसेच त्यांचा गाईगोठा सांभाळत होते.गाईंच्या धारा काढणे, वैरणपाणी करणे, शेणघाण काढणे ही सर्व कामे ते मनापासून करत असत.अजित पवारांचाही त्यांच्यावर विशेष लोभ होता.ते त्यांचे खुप जवळचे व विश्वासू कर्मचारी होते.

दरम्यान जालिंदर शेंडगे फेब्रुवारी महिन्यापासूनच आजारी होते.त्यांच्यावर बारामती शहरातील रुग्णालयात उपचार सुरू होते.त्याचवेळी राज्याचा अर्थसंकल्प असल्यान अजित पवार अत्यंत व्यस्त होते.तरीही जालिंदर आजारी आहेत हे कळताच अजित दादा सतत संपर्कात राहत होते.

जालिंदर यांची प्रकृती परत खुप बिघडली व त्यांना दवाखान्यात नेण्याची गरज निर्माण झाली, हा निरोप कळताच अजित पवारांनी स्वता पाठपुरावा करत जालिंदर दवाखान्यात भरती होत नाही तोपर्यंत संपर्क ठेवला.अतिशय व्यस्त अशा त्यांच्या दिनक्रमातून ते वेळ काढत होते.मुंबईतूनच फोन करत डॉक्टरांना त्यांनी काहिही करा परंतु जालिंदरला बर करा अशी विनंती केली होती.परंतु वयोमान आणि प्रकृती बिघडल्याने जालिंदर यांच दुखद निधन झाल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.