तिच्या हातून ट्रॅक्टर दुरुस्त व्हावा अशी ग्राहकांची इच्छा असते, अशी आहे धनश्रीची गौरवगाथा!

0

मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली आज समाजात वावरताना दिसतात ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र कर्तृत्वाच्या बाबतीत पण मुली अजिबात कमी नाहीत.

आभाळाला गवसणी घालण्यापासून वैद्यकीय, शैक्षणिक, तंत्रज्ञान निर्मिती अशा विविध क्षेत्रात मुली पुढे असल्याचे दिसून येते. अशीच एका मुलीच्या कर्तृत्वाचा हा लेखाजोखा!

भंडारा जिल्हयातील साकोलीत राहणारी धनश्री प्रेमलाल हातझोडे. ती शिक्षण बी.ई.मेकॅनिकल इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण आहे. मात्र आपल्या कौशल्याच्या जोरावर आणि कर्तृत्वाच्या बळावर तिने भल्या भल्यांची बोलती बंद केली आहे. अवघ्या 22 वर्षाची ही तरुणी सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. ‘मामा ट्रॅक्टर’ नावाचा ट्रॅक्टर दुरुस्तीचा व्यवसाय आहे. तिने ट्रॅक्टर दुरूस्तीचे काम सुरू केलं तिने ज्या वेळी हे काम सुरू केलं त्या वेळी तिचे खूप हसू केलं. मात्र आपले काम सातत्याने तिने अधिकाधिक उत्तम करत लोकांची मने जिंकली.

हसणाऱ्या लोकांना आज ‘तिच्या हातूनच ट्रॅक्टर दुरुस्त व्हावा’ असा आग्रह धरावा लागतो हेही नसे थोडके. वडिलांना इच्छा बोलावून दाखवताच त्यांनी तिला प्रशिक्षण दिले. हळू हळू वडिलांच्या सोबत ती सुद्धा चांगलीच कामात गती होऊ लागली. तिला वडिलांकडून कामाचा योग्य तो मोबदला मिळतो. तिचे कार्य मात्र निश्चित उल्लेखनीय आहे. स्वतः च्या पायावर उभा ती सक्षमपणे आहे ही कौतुकाची बाब आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.