वाळू माफियांचे दिवस भरले; नांदेडचे जिल्हाधिकारी सिंघम स्टाईल पोहचले नदी किनाऱ्यावर

0

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली लक्षात घेत स्वतः जिल्हाधिकारी यांनी लक्ष घातले. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू आहे. रेती चोरी केली जाते याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांना मिळाली त्यांनी स्वतः या मध्ये लक्ष घातले.

वाळू माफिया यांना कारवाईचा सुगावा लागू नये म्हणून स्वतः जिल्हाधिकारी मोटरसायकलीवरून घाटावर पोहोचले. या कारवाईबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीयता ठेवली होती. सोबतच्या सहकारी अधिकाऱ्यांना देखील कारवाई बद्दल माहिती देण्यात आली नव्हती. मार्कंड आणि गंगाबेट या दोन ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी धाड टाकली. या कारवाईत दोन जेसीबी, एक बोट, अठरा रोप वे मशीन, सात हायवा गाड्या आणि जवळपास दीड हजार ब्रास रेती जप्त करण्यात आली.

वाळू माफिया मात्र फरार झाले आहेत. पोलिस मात्र कारवाई होत नसल्याचे सांगितले जात होते. या लोकांना राजकीय पाठबळ असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेती चोरी रोखण्याची जबाबदारी मुख्यतः पोलिसांची आहे. रेती चोरी रोखण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाने अनेक कठोर नियम केले. पण तरीही रेती चोरी थांबत नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.