भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार ; १० नगरसेवकांनी केला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

0

महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष सद्य परिस्थिती मध्ये आपल्या आपल्या पक्षाचा विस्तार करताना दिसून येतो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथा पालथ होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. शिवसेना आणि भाजप मधील राजकीय कलह हा अजूनही कमी होताना दिसत नाही. अशाच मध्ये शिवसेनेनं सर्जिकल स्ट्राईक करत भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे.

हिंगणघाटमधील भाजपचे विद्यमान १० नगरसेवक आणि २ माजी नगरसेवक सेनेत प्रवेश करणार आहे. राज्यात एकीकडे शिवसेना आणि भाजप युतीचं चित्र भाजप नेते अजूनही रंगवत आहेत. मात्र शिवसेना अधिकाधिक विस्तार करण्यात व्यस्त आहे. शिवसेनेनं आपला पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरूच ठेवली आहे.

शिवसेनेने आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून भाजपला उघड आव्हानच दिले आहे. शिवसेनेचा वाघ आता आक्रमक झाला आहे असे म्हणायला आता हरकत नाही. कारण गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला आहे, तिथे शिवसेनेने पाय पसरायला सुरुवात केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.