
कॉमेडी अॅक्टर भूषण कडूची बायको कांदबरी कडू हिचा कोरोनान मृत्यू
कोरोनान अनेक दिग्गजांना मृत्यू दिला. यात हिंदी मनोरंजन क्षेत्रासह मराठी इंडस्ट्रीतही अनेकांनी आपले जीवलग गमावले आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू असून लवकरात लवकर कोरोनाचीसाथ जाऊन सगळ पूर्वीसारख चालू व्हाव अशी सर्वच लोकांची इच्छा आहे. कोरोनामुळे सध्या नाट्यसृष्टी बंद आहे. नाट्य कलाकार लोकांच प्रत्यक्ष मनोरंजन करतात. लोकांना तणावातून मोकळे क्षण देतात. अशाच एका विनोदी अभिनेत्याला पत्नी निधनाच दुख झालय चला जाणून घेऊया कोण आहे तो
अभिनेता भूषण कडू कॉमेडी एक्सप्रेसमध्ये हसवणार्या भूषण कडूची पत्नी कादंबरीने त्याची आई आजारी असताना दवाखान्यात तिची सेवा केली भूषणला सांभाळल या सगळ्या जाणीवातून भूषण आणि कादंबरीत प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी लग्न केल. भूषण आणि कादंबरीला एक मुलगा आहे. आनंदात चालेल्या या संसाराला कोरोनान ग्रासल आणि भूषणची पत्नी कोरोनाग्रस्त झाली. तिच्यावर उपचाराची शर्थ केली गेली परंतु काल तिने अखेरचा श्वास घेतला आणि तिचा मृत्यू झाला.
भूषण कडूने अनेक चित्रपटातही काम केलेल आहे. भूषणच पत्नीवर प्रेम होत. भूषण आणि लहान मुलगा यांना पोरक करत कांदबरीन अखेरचा निरोप घेतला.