कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू ,धक्क्यान पत्नी तीन तास बेशुध्द,कोथरुडमधील घटना.

0

कोथरूड येथील केळेवाडी,हनुमान नगर भागात राहणारे प्रमोद कुमार मंडल(वय 39) आणि त्यांची पत्नी नीरुदेवी मंडल यांनी सर्दी,ताप अशा लक्षणांमुळ जवळील डॉक्टरना दाखवल.

त्यांनी प्रकृतीच्या दृश्य परिस्थितीवरून कोविड चाचणी करण्याचा सल्ला दिला.परिणामी दोन्ही पती पत्नीने सरकारी दवाखान्यात कोविड चाचणी करून घेतली,परंतु रिपोर्ट मिळता मिळेना, शेवटी दोघांनी खाजगी दवाखान्यात दुसर्यांदा तपासणी करून घेतली.

परंतु रिपोर्ट हाती येण्यापूर्वीच काल शनिवारी त्यातील पती प्रमोद कुमार मंडल याचा घरातच मृत्यू झाला.पतीच्या अशा अचानक झालेल्या अवस्थेने पत्नी नीरूदेवी तब्बल 3 तास बेशुध्द पडली.

दरम्यान मंडल यांच्या शेजारी राहणार्या ओव्हळ यांनी सांगितल की,मंडल पतीपत्नींची ही अवस्था बघून आम्ही हर्षवर्धन मानकरांना कळवल,नगरसेविका छाया मारणे आणि इतर प्रतिनिधीनी सातत्यान आरोग्य यंत्रणेशी संपर्क ठेवला व रुग्णवाहिका बोलवण्याचा प्रयत्न केला.

परंतु सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या या प्रयत्नांना तब्बल2 तासांनी यश आल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.प्रशासनाच्या या हलगर्जी कारभारामुळे नागरिक संतप्त झाले.

मंडल पतीपत्नींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यात पती प्रमोद कुमार मंडल कोरोना बाधित आढळले त्यांचा त्यामळेच मृत्यू झाल्याच समोर आल तर पत्नी नीरूदेवीही कोरोना पाॅझीटिव्ह आढळल्या.त्यांना तब्बल तीन तासांनी शुध्द आली.सध्या त्या ससूनमध्ये उपचार घेत आहेत.

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर असून आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण असहय्य ठरत आहे.रूग्णाचा कोरोना पाॅझीटिव्ह रिपोर्टच जर वेळेवर मिळाला नाही तर त्याच्या जीवावर बेतू शकत हेच या उदाहरणातून समोर येत आहे.

लोकप्रतिनीधींनी संपर्क करूनसुध्दा रुग्णवाहिका यायला इतका उशीर होत आहे तर सर्वसामान्यांची काय गत होऊ शकते कल्पना भयावह आहे.दरम्यान आज मुख्यमंत्री टास्क फोर्सची बैठक घेऊन किमान 8 दिवस कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.