कोरोना काळात अनाथ मुलांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी ‘राष्ट्रवादी जीवलग’ भरुन काढणार…

0

कोरणा चे आलेली साथ अनेक मुलांना अनाथ करून दिली आहे अशाच मुलांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहात राज्यातील मनात असलेल्या साडेचारशे मुलांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्ली येथून फेसबुक लाईव्हवरुन केली.

‘राष्ट्रवादी जीवलग’ या मोहिमेचा पहिल्या टप्प्यामध्ये पक्षातील एक सहकारी असे ४५० जण ४५० मुलांच्या कुटुंबाशी जोडले जाणार आहेत या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी दूध निर्माण केला असून यामध्ये मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर मुलांसाठी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता जोडला जाणार आहे असे खासदार सुळे यांनी सांगितले. या अनोख्या मोहिमेच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या कुटुंबामध्ये नेमकी काय समस्या आहे ही माहिती पक्षाकडे पाठविण्यात येणार आहे. या माध्यमातून एक व्यापक कार्यक्रम व पारदर्शक कारभार केला जाणार आहे. शिवाय यांची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाईटवर व स्वतः माझ्या पेजवर उपलब्ध राहिल असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.