
नुकताच सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल झाला असून त्यात एक तरुणी एका वृद्धाला पाठीवर घेऊन चालत असल्याचे दिसत आहे. हा फोटो अतिशय कौतुकास्पद ठरत असून नेटकरी याचे कौतुक करत आहेत. फोटोतली तरुणी २४ वर्षीय असून तिचे नाव निहारिका दास असे आहे. तिने आपल्या वृध्द कोरोना पॉझिटीव्ह सासर्याला पाठीवर घेतले आहे. निहारिका यावर प्रतिक्रिया देताना म्हणाली अशी परिस्थिती कोणावरही न येवो. ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधा झाल्या पाहिजेत. त्या नसल्यानेच माझ्यावर ही वेळ आली.
२ जून यादिवशी ही घटना घडली. आसामच्या रहगावजवळील भाटगाव येथील निहारिकाला सासरे थुलेश्वर यांच्यात कोरोना लक्षणे आढळली. निहारिकाला नवरा सिलीगुडीत नोकरी करतो, परिणामी तो घरात नव्हता. निहारिकाच्या घराजवळचा रस्ता अतिशय खराब आहे, त्यामुळे तेथे रिक्षा येऊ शकत नव्हती. त्यात सासरे अशक्त ते चालू शकत नव्हते. परिणामी निहारिकाने सासऱ्यांना पाठीवर घेतले रिक्षा गाठली. सामुदायिक चाचणी केंद्रात चाचणी होताच त्यांना नागगावमधील कोविड सेंटरला न्यायला सांगितले गेले. नायगाव येथेही निहारिकाला सासऱ्यांना पाठीवर घेत ३ मजले चढून वर जावे लागले. निहारिका स्वता कोविड पॉझिटिव्ह आलेली आहे. दुर्दैवाने एवढी धडपड करूनदेखील निहारिकाचे सासरे थुलेश्वर यांचा ५ जूनला मृत्यू झाला.
निहारिका म्हणाली, ग्रामीण भागात आरोग्य सेवासुविधा सुमार असून रस्तेही खराब आहेत. गावात एकही रुग्णवाहिका नसल्याने मला सासऱ्यांना रिक्षातून न्यावे लागले. परंतु एखाद्या रुग्णाला आॅक्सीजनची गरज पडल्यास त्या व्यक्तीचा तिथेच मृत्यू होऊ शकतो. नेटकर्यांनी निहारिका दासचे कौतुक करत तिच्या धाडसाला सलाम केला आ