राज्यात कोरोना स्थिती भयावह – अंबाजोगाई शहरात एकाच चितेवर आठजणांचा अंत्यसंस्कार

0

राज्यात कोरोनाचा होणारा उद्रेक भयावह असून अत्यवस्थ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.कोरोनाची दुसरी लाट पसरत असतानाच या लाटेचा प्रसार वेग 60 टक्के जास्त आहे.तसेच रुग्णात दिसणारी लक्षण नगण्य आहेत.परिणामी दुर्लक्ष होऊन आजार बळावल्यावरच कोरोना निदान करण्याची चूक लोक करत आहेत.कोरोनाचा दुसरा स्ट्रेंथ भारतात आढळत असताना अमेरिकेत बी 1.1.7 या नव्या स्ट्रेंथचा धुमाकूळ सुरू आहे.या प्रकारचा स्ट्रेंथ भारतात पसरण्याचा धोका नाकारता येत नाही.राज्यात सध्या फक्त 3 दिवस पुरेल इतका लसीचा साठा उपलब्ध असून केंद्र सरकार 15 तारखेला अतिरिक्त लस पुरवठा करणार आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी राज्यात निर्बंध लावण्यात येत असून व्यापारी वर्ग व नागरिक याला मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत.गर्दी टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती टाळता येण शक्य होत नाही आहे.स्वयंशिस्त पाळण्याबाबत लोक गाफिल झाली आहेत.

दरम्यान विदर्भ,मराठवाड्यात सध्या कोरोनाची भीषण परिस्थिती असून रुग्णसंख्या दर झपाट्याने वाढत आहे.जळगाव,नागपूर,अमरावती याबरोबरच बीड जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे.अनेकांना बेड मिळत नाहीत तर काही ठिकाणी व्हेंटिलेटर्स कमी आहेत.बीड जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवसात सुमारे 617 नवीन रुग्ण वाढले आहेत तर 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.बीडमधीलच नव्हे तर संपूर्ण राज्यात थोड्याफार फरकाने हिच परिस्थिती आहे.मंगळवारी म्हणजेच काल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयातील सात तर लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण 8 जणांचा कोरोनान मृत्यू झाला.या आठ मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळेना, परिणामी नगरपालिका प्रशासनाने 8 चिता रचण्याऐवजी एकच चिता रचत त्यावर ओळीने आठ मृतदेह ठेवत एकाच सरणावर अंत्यसंस्कार पार पाडले.या मृत्यू झालेल्या लोकांचे नातेवाईक नियमानुसार या कार्याला उपस्थित नव्हते पण या भयावह स्थितीवरून कोरोना आजाराची तीव्रता लक्षात येते.

राज्य शासनाने राज्यात कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कंबर कसली असून लोकांना कळकळीची विनंती, चर्चा अशाप्रकारे उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे.परंतु ही परिस्थिती पाहता कडक पावल उचलण्याची गरज आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.