अबुधाबीत भव्य BAPS स्वामी नारायण मंदिराची उभारणी

0

संयुक्त अरब अमिराती : संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबीमध्ये भव्य दिव्य अशा स्वामी नारायण मंदिराची उभारणी करण्यात येत आहे.हे मंदिर एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे.BAPS स्वामी नारायण मंदिराची पायाभरणी 2020 च्या एप्रिलमध्येच झाली होती, दरम्यान कोरोना महामारीच्या संसर्गामुळे बांधकाम काही काळ थांबवा होत परंतु डिसेंबर महिन्यापासून कामाने गती घेतली मंदिराचे बांधकाम सुरू असतानाचे काही फोटो समोर आले होते त्यातून मंदिराची भव्यता दिसून येत होती युएईमधील हे मंदिर BAPS स्वामीनारायण संस्थेने उभारले असून मंदिर अबु मुरेखातील अल रहबा भागात उभारल गेल आहे. मंदिर उभारणीसाठी युएई आणि भारत या दोन्ही देशांनी काम केल आहे.गुजरात आणि राजस्थानमधील 2000पेक्षा जास्त शिल्पकारांनी घडवलेल्या दगडाच्या भिंती त्यावरील कोरीव सुंदर नक्षीकाम यामुळे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

मंदिर 55000 चौकिमीच्या विस्तृत जागेवर वसवल असून यात सर्व प्रकारच्या सुविधा असणार आहेत.मंदिरात सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमासाठी कॉप्लेक्स असणार आहेत.प्रार्थना स्थळ, शिक्षण क्षेत्र,लहान मुलांसाठी गेम झोन, थीमॅटीक गार्डन, फूड कोर्ट, पुस्तक आणि गिफ्ट शाप असणार आहेत.पार्किंगसाठी मोठी जागा करण्यात आली असून 12000 गाड्या पार्क करता येणार आहेत.तसेच दोन हेलिपॅड उभारण्यात आले आहेत.या मंदिर उभारणीसाठी स्थानिक राजांनी पाठिंबा दिलेला असून मंदिरात भारताचा सांस्कृतिक इतिहास,देवी देवता यांचे चित्रण दाखवलेले आहे.हिंदू धारणा, रामायण, महाभारतातले प्रसंग यांचीही शिल्पे मंदिरात आहेत. युएईच्या 7 राज्यकर्ता दर्शवणारी सात शिखरे मंदिराला आहेत.

दरम्यान भारतातून अनेक नागरिक युएईमध्ये कामाच्या तसेच व्यवसायाच्या निमित्ताने युएईमध्ये जाता काही लोक तिथेच स्थायिक झाली आहेत.युएईच्या एकूण लोकसंख्येच्या 39टक्के लोक भारतीय आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.