काँग्रेस स्वबळावरच लढणार, आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही : नाना पटोले

0

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या संघटनाचा विस्तार करताना दिसत आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत कसे करता येईल या दृष्टीने प्रत्येकाचे काम सुरू आहे. आगामी काळामध्ये काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे त्यादृष्टीने संघटनात्मक बांधणी काँग्रेस पक्ष करत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जळगाव दौऱ्यावरती आहेत. त्या ठिकाणी बोलत असताना नाना पटोले म्हणाले “आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही”. अशी प्रतिक्रिया देत नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा पुनरुच्चार केला आहे.

जळगाव दौऱ्यावर असताना नाना पटोले यांनी कृषी कायद्याच्या प्रतीचे दहन करत निषेध नोंदवला आहे. तसेच यावेळी मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत नारे लावण्यात आले यावेळी खान्देश प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, अतुल लोंढे आ.शिरिष चौधरी माजी खासदार उल्हास पाटील आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.