
सायकलवरून राजभवनात पोहचले काँग्रेस नेते, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांना निवेदन!
महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचे देशभरातील विविध मुद्द्यावरून दहा दिवसाचे आंदोलन सुरू आहे. या अनुषंगाने महागाई पेट्रोल-डिझेलची व गॅसची दरवाढ, डाळीचे वाढलेले भाव या महागाई विरोधात राज्यभरामध्ये काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. या महागाई चा असर सर्वच घटकांवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. गरीब, मध्यमवर्ग आणि नोकरदार हा महागाईमुळे पिचला गेला आहे. या सर्वांच्या अडचणींच्या बद्दलचा हाच आवाज झोपलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी काँग्रेस उठवत आहे.
महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांनी आज मलबार हिल येथील हँगिंग गार्डन येथून सायकल रॅलीने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. इंधन दरवाढ, महागाईबरोबरच, मराठा, ओबीसी आरक्षण आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवदेन दिले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांची विविध विषयावरती चर्चा केली. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामधील नव्हेतर देशांमधील महत्त्वपूर्ण अशा प्रश्नावरती केंद्र सरकारला घेण्याचे काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येत आहेत.
हे आंदोलन 7 जुलै रोजी सुरू करण्यात आले होते, तर 17 जुलैपर्यंत राज्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते आणि फ्रंटल सेलचे पदाधिकारी यामध्ये सहभागी असणार आहेत. पाऊस ऊन वारा याचा विचार न करता स्वतःचा काँग्रेसचे दिग्गज नेते यामध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत.