राज्याची कोरोना स्थिती पाहता कडक लाॅकडाऊन लावावा लागेल.काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचे मत

0

राज्यात कोरोना स्थिती भयावह असून रुग्ण उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत.अशा परिस्थितीत लावलेल्या कडक निर्बंधाना नागरिक जुमानत नसून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.अशा परिस्थितीत कडक लॉकडाऊन लावण गरजेच असल्याच मत पृथ्वीराज चव्हाणांनी मांडल.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले १४५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात लसीकरण करण कठीण पातळीवरच काम असून सध्या लसींचा तुटवडा निर्माण होत आहे.त्यातच केंद्र सरकारन १ मे पासून १८वर्षाखालील सर्वांना लसीकरण करण्याची घोषणा केली आहे.अशा पार्श्वभूमीवर लसींचा तुटवडा पडल्यास गोंधळ उडू शकतो.केंद्रान भारताकडे भरपूर लस असून देश दुसर्या देशांना लस निर्यात करत आहे अस परोपकारी चित्र निर्माण केल आहे,परंतु वास्तव वेगळ असून सिरम इन्स्टिट्यूटला ब्रिटनने काही टक्के लस ब्रिटनला निर्यात करण्याची सक्ती केली आहे.परिणामी आपल्या देशात लसीचा किती पुरवठा होईल हे सांशक आहे.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले,सध्या नवीनच एक टूम निघाली असून परदेशातून लस आयात करा व लसीकरण करा अशाप्रकारे चर्चा सुरू आहे.परंतु परदेशातून लस आणून त्याला ड्रग कंट्रोलची मान्यता मिळण्यास उशीर लागू शकतो,तसेच त्यांच्याच देशात लस कमी पडत असताना ते आपल्याला लस निर्यात का करतील असा प्रश्न उभा ठाकला आहे.तसेच राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तसेच व्यवस्थापनावरील ताण कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊन लावावा लागेल असही मत त्यांनी मांडल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.