‘…तर शिंदे गटाला लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही’

0

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले मात्र नवे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्रातल सुसंस्कृत राजकारण संपलेल आहे, आता फक्त सत्ता लोभी सत्ता कारण सुरू असून भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाची फसवणूक केली आहे. त्यांना भाजप किंवा मनसे मध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय नाही असं झालं तर शिंदे गटाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही . असा घणाघात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

तुम्हाला मंत्रिमंडळ विस्तारासाठी सतत दिल्लीला जावं लागतं यातच तुमचा अपयश दिसून येतं, शिवसेना संपून आपल्याला सत्ता मिळवायची ही भाजपची संस्कृती आहे. महाराष्ट्रात शेतकरी, बी-बियाणे यांचे प्रश्न ऐरणीवर आहेत त्यांना वाऱ्यावर सोडून दिलंय, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून दिले आहे. आत तर कहरच केला आहे. मंत्रिमंडळ स्थापन न करता येणे ही अक्षम्य अशी बाब आहे. अशी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.

एकनाथांच्या राज्यात महाराष्ट्र अनाथ झालाय

कोणाला कोणते मंत्रिपद भेटते यासाठी प्रचंड ओढाताण सुरु आहे. 50 लोक गेलेले आहेत मंत्रिमंडळ 43 आहेत भाजपचे 105 आहेत. त्यांना किती हवेत यांना किती हवेत, मलिदा कोणाला किती भेटेल, कोणाला किती पैसे भेटतील हेच ठरेना. किती महामंडळात किती पैसे भेटतात कोणत्या मंत्रिपदात किती पैसे भेटतात हे फक्त एकट्या शिंदे-फडणवीसांना थोडी ना माहित आहेत? बाकीच्यांना देखील याची कल्पना आहेच ना. या चक्कर मध्ये मात्र एकनाथांच्या राज्यात महाराष्ट्र अनाथ झालाय. असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

अमित शहा देशात धर्मांधता पसरवत आहेत

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मला अमित शहा यांच्यात सरदार पटेल यांची प्रतिमा दिसते असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा अतुल लोंढे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सरदार पटेल यांनी देश जोडून एक केला. सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरदार ही पदवी मिळवली आहे. हे मात्र एका समूहाचे सरदार आहेत. देशामध्ये धर्मांधता पसरवणे एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात उभे करणे, एका जातील दुसऱ्या जातीच्या विरोधात उभे करणे हे यांचं काम आहे. म्हणून अमित शहा एका गिरोहाचे सरदार असल्याची टीका देखील लोंढे यांनी केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.