‘महाराष्ट्रात आणीबाणी लावावी’, काँग्रेस नेत्याची मोदींकडे मागणी

0

मुंबई : करोना साथीचा फैलाव गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडालेली आहे. यावरून ठाकरे सरकार आणि केंद्र सरकार अनेकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, यातच आता काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी पंतप्रधान मोदींकडे महाराष्ट्रात आणीबाणी लागू करण्याची मागणी करत सत्तेत असलेल्या आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

करोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशा आशयाचे पत्र पंतप्रधानांना लिहिले असून, राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे देशमुख म्हणाले आहेत.

तसेच राज्यात करोनाने ६० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संविधानाच्या कलम ३६० अन्वये महाराष्ट्रात २ महिन्यांची आणीबाणी लागू करावी. जर अशीच परिस्थिती राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, असे देखील आशिष देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.