काँग्रेसचे अभ्यासू , तरुण नेतृत्व पंचतत्वात विलीन, कै.राजीव सातव यांच्या राजकीय कारकीर्दीचा थोडक्यात आढावा

0

मुंबई : काँग्रेसचे तरुण, उमदे खासदार राजीव सातव हे २२ एप्रिलपासून कोरोना संसर्गान आजारी होते. राजीव सातव पुण्यातील जहांगिर हाॅस्पिटलला अॅडमिट होते. राजीव सातव गेले काही दिवस व्हेंटिलेटरवर होते. केवळ काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षातील नेत्यांशीही त्यांचे ऋणानुबंध होते. राजीव सातव यांना सायटोमेगालो विषाणूचा संसर्ग झाला आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जनतेच्या या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रध्दांजली.

राजीव सातव यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७४ साली हिंगोली जिल्ह्यातील मसोड तालुका कळमनुरी येथे झाला. राजीव सातव यांना त्यांच्या घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या मातोश्री शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या. राजीव सातव यांचे कॉलेज शिक्षण फर्ग्युसन काॅलेज पुणे येथे तर आय एल एस लॉ कालेज पुणे येथे पार पडले. २००२ साली त्यांचा विवाह झाला. सध्या त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत.

राजीव सातव यांची राजकीय कारकीर्द आत्यंत संघर्षपूर्ण राहिली. विनम्र स्वभाव, उमदेपणा, अभ्यासूपणा हे त्यांचे ठळक गुण होते. राजीव सातव यांची राजकीय कारकीर्द पुढे दिलेली आहे, त्यावरून लक्षात येते की, त्यांनी अथक प्रयत्नांची कांस धरली होती.
१) २००२ साली ते हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समितीचे सदस्य झाले.
२) २००७ साली ते हिंगोली जिल्हा परिषद सदस्य झाले. आणि कृषी व पशु संवर्धन सभापती झाले.
३) २००८ साली ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
४) २००९ साली ते कळमनुरी विधानसभेचे आमदार झाले.
५) २०१० साली भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
६) २०१४ साली ते हिंगोली लोकसभेचे खासदार झाले.
७) २०१८ साली ते काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी झाले.
८) २०२० साली महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्त झाले.

अवघ्या ४७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेणारे राजीव सातव राहुल गांधीचे विश्वस्त होते.अनेक कार्यकर्त्यांना ते पोरक करून गेले. काँग्रेसचे एक अभ्यासू, आशादायी नेतृत्व पंचतत्वात विलीन झाले. सर्व शोकमग्न सदस्यात आम्हाही सहभागी आहोत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.