मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात

0

मुंबई : येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून पक्षाच्या वतीने नवीन कार्यकरणीची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन कार्यकरणीत ६ ज्येष्ठ उपाध्यक्ष, १५ उपाध्यक्ष, ४२ महासचिव, ७६ सचिव व ३० कार्यकारी सचिवांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसचे झुंझार नेते भाई जगताप यांची डिसेंबरमध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. भाई जगतापांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्र सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने केली आहेत. मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे.

 

कॉंग्रेसच्या या नवीन कार्यकरणीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले असून सर्व वर्गातील कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्रदान करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसप्रमाणे प्रदेश पातळीवर देखील काँग्रेसमध्ये अनेक बदल घडवण्यात येणार आहेत

मुंबई काँग्रेसची नवीन कार्यकरणी :-

ज्येष्ठ उपाध्यक्ष – मधू चव्हाण, बाबा सिद्दीकी, वीरेंद्र बक्षी, जेनेट डिसुझा, गणेश यादवी, शिवजी सिंह

उपाध्यक्ष – अशोक सुतराळे, नगमा मोरारजी, युसुफ अब्राहनी, दिनेश हेगडे, जॉर्ज अब्राहम, मोहम्मद शरीफ खान, जयप्रकाश सिंह, मोहसीन हैदर, वीरेंद्र उपाध्याय, धर्मेश व्यास, अर्जुन सिंह, गोविंद सिंह, जुनैद पटेल, प्रवीण नाईक, प्रणिल नायर

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.