‘अमित शहा सहकार मंत्री झाले त्या बद्दल त्यांचं अभिनंदन पण..!’ जयंत पाटलांनी लावला टोला!

0

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे यामध्ये नामवंत मंत्र्यांच्या मंत्रीपदाला कात्री लागली आहे. अशा मध्येच बहुतांश नवीन चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली आहे काही मंत्री हे इतर आलेले असून निष्ठावंत लोकांना डावलून यांना संधी देण्यात आली आहे.

या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार मध्ये ४३ मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला. सोबतच एका नवीन खात्याचा समावेश करण्यात आला आहे. देशातील सहकार चळवळीला अधिक गती देण्याच्या उद्देशाने केंद्रात सहकार विभाग हे नवीन खातं तयार करण्यात आलं असून त्याचा कार्यभार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे की हे खाते महाराष्ट्रामधील सहकार साम्राज्याला म्हणजेच राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या कारखानदारांना नियंत्रणात आणण्यासाठी निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्या सहकार मंत्रिपदाचं स्वागत केलं आहे.

अमित शाह यांच्या मंत्रिपदासाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच अप्रत्यक्षपणे टोला लावत ते म्हणाले की “गुजरात आणि महाराष्ट्रातच सहकार आहे. गुजरातमध्ये अमित शाह एक बँकही चालवत होते. नोटबंदीच्या काळात त्यांच्या एका बँकेचं नाव फार चर्चेत आलं होतं. जास्त नोटा त्या बँकेत एक्सचेंज झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे सहकाराचा त्यांना अनुभव आहे”, असं ते म्हणाले.

तसेच पुढे बोलत असताना जयंत पाटील यांनी अमित शाह यांना आवाहन केलं आहे की. “गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यात फारसा फरक नाही. अमित शाह यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल. मी त्यांच्या नेमणुकीचं स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधनं घालतेय, त्यांची स्वायत्तता धोक्यात आलीये. त्यांना अमित शाह सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे. देशातल्या बँकिंग व्यवसायावर अन्याय होतोय”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मिश्कील टिप्पणी साठी चांगलेच प्रसिद्ध आहेत त्यांनी अमित शहा यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत त्यांना मिश्किल टोला सुद्धा मारला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.