अॅडव्होकेट जयश्री पाटील यांच्या विरोधात तक्रार – अनिल देशमुखांविरोधात दाखल केली होती याचिका

0

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली करणार्या जयश्री पाटील सध्या अडचणीत सापडल्या आहेत.जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देत मुंबई उच्च न्यायालयान अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी लावली व 15 दिवसात अहवाल कोर्टाला सादर करावा अस स्पष्ट केल आहे.परिणामी राजकीय घडामोडींना वेग आला व गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा दिला.

अॅड. जयश्री पाटील यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.यात मराठा क्रांती मोर्चाचे विरेंद्र पवार यांनी जयश्री पाटील यांच्यावर आरोपांची जंत्रीच लावली आहे. अनिल देशमुखांविरोधात जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती, तेथे बोलताना त्या नेहमी मराठा समाजाचा उल्लेख करत होत्या.तसेच मुद्दामहून मराठा समाजाला बदनाम करण्याच षडयंत्र त्या आखत असतात.तसेच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.परिणामी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही विरेंद्र पवार यांनी केली आहे.

विरेंद्र पवार तक्रार केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले,जयश्री पाटील या वारंवार मराठा समाजाला बदनाम करत असतात तसेच त्यांनी सुप्रिम कोर्टातही मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडली होती.मराठा समाजाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही.जर जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची माफी मागितली नाही तर भविष्यात मराठा समाज त्यांच्याविरुद्ध आणखी आक्रमक कारवाई करेल असेही त्यांनी स्पष्ट केलं.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.