आ. रोहित पवारांची मुलांच्या हट्टापाई ‘शिंदे डेअरी’ ला कौटुंबिक भेट!

0

आमदार रोहित पवार सातत्याने नवनवीन उद्योजकांना भेटी देत असतात. उद्योजकांचा व्यवसाय वाढावा त्यांच्या काही समस्या असतील तर त्यांची सोडवणूक करावी तसेच महाराष्ट्रामध्ये उद्योजकांची संख्या वाढावी असा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. आमदार रोहित पवार स्वतः एक व्यवसायिक असल्याने त्यांना व्यवसायिकांच्या बद्दल विशेष आत्मीयता आहे.

आ. रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली की “बैठक आटोपून घरी आलो असता रविवार असल्याने आनंदिता आणि शिवांशला फेरफटका मारायला घेऊन गेलो. यावेळी त्यांनी आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केल्याने १०० वर्षाहून अधिक काळ डेअरी व्यवसायात असलेल्या आणि १ हजारहून अधिक म्हशी असलेल्या ‘शिंदे डेअरी’ला भेट दिली.

तसेच “इथं दर्जेदार आईस्क्रीम तर मिळालीच पण सोबत डेअरी व्यवसायाचाही अनुभव मुलांना मिळाला. यावेळी डेअरीचालक रणजित आणि अजित शिंदे यांच्याकडूनही मुलांनी माहिती घेतली”. असे ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्याच्या स्वभावाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तरुणांच्या मध्ये लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.