आ. निलेश लंके यांचे व्हिडिओद्वारे लोकांना मदतीचे आवाहन, लहान मुलाच्या उपचारासाठी नागरिक करत आहेत मदत!

0

आ. निलेश लंके यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून एका लहान मुलाच्या उपचारासाठी आवाहन केलं आहे. युवान अमित रामटेककर हा पंधरा महिन्याचा मुलगा असून तो पुनावळे, पुणे येथील रहिवासी आहे. त्याला एसएमए टायप १ या अत्यंत दुर्मिळ जनुकीय आजाराचे निदान झाले आहे आणि यातून त्याला बरे होण्यासाठी १६ कोटींच्या जनुक थेरपीची लस आवश्यक आहे. कौटुंबिक स्तरावर त्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र उपचारासाठी लागणारी रक्कम मोठी असल्याने त्यांनी आ. निलेश लंके यांच्याकडे मदतीची मागणी केली. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत निलेश लंके यांनी नागरिकांना मदतीची मागणी केली आहे. आजतागायत या आजाराच्या उपचारासाठी एक दीड कोटी रुपयांची मदत गोळा झाली आहे, पुढील उपचारासाठी अजून तुमच्या मदतीची आवश्यकता आहे असे त्यांनी आवाहन केलं आहे.

त्यांच्या या व्हिडिओ ला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. त्यांची कामाच्या प्रती असणारी श्रद्धा पाहून लोक निलेश लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. तसेच त्यांनी खाली बँक खात्याची माहिती सुद्धा दिली आहे.

Name : Yuvaan Amit Ramtekkar
Account no. 40150960390
Ifsc : SBIN0017292
Sbi branch ravet

Google pay phone pay and patym no. 8237945466 and 7875012055

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.