आ. निलेश लंकें यांनी करून दाखवले जादूचे प्रयोग!

0

आमदार निलेश लंके म्हणजे माणसात मिसळणारा माणूस. प्रचंड जनसंपर्काचे आवड असणारे नेतृत्व आणि लहान मोठे असा भेद न ठेवता सर्वांशी आपुलकीने संवाद साधणारा आमदार अशी त्यांची राज्यात ओळख आहे. असाच एका लहान मुलींने हट्ट केल्यानंतर आ. निलेश लंके यांनी जादूचा प्रयोग करून दाखवत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

“भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कन्या आंतरराष्ट्रीय म्याझेशियन के.भागवत आणि म्याझेशियन रिया भागवत यांनी जादूचे प्रयोग सादर करत मनोरंजन केलं,यावेळी लहान मुलीं न माझ्या कडे जादूचा हट्ट केला तो जादूचा प्रयोग करत मी त्या मुलीचा हट्ट पूर्ण केला”. अशा आशयाची पोस्ट केली आहे.

आ. निलेश लंके यांनी सोबत एक व्हिडीओ फेसबुक अकाउंट वरती टाकला आहे या व्हिडिओला लोकांचा फारच जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओ मध्ये त्यांनी जादूचा प्रयोग करून दाखवला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.