राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी ‘जमावबंदी’

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार आजपासून रात्रीच्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशांमध्ये कसला उल्लेख करण्यात आला आहे, हे आता आपण जाणून घेणार आहोत.

राज्यातील वाढत्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येणार आहे. तसंच, बाहेर ६ फुटांचं अंतर राखणं गरजेच आहे, गर्दीच्या ठिकाणी थुंकल्यास दंड वसुल करण्यात येणार आहे. खासगी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असंही या आदेशात नमूद केलं आहे.

सर्व सिनेमाहॉल व मल्टिप्लॅक्स, मॉल्स, रेस्टॉरंट देखील रात्री ८ ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहेत. रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरी आधी दिलेल्या आदेशानुसार सुरु राहणार आहेत. राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी फक्त ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर, अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

 

 

रात्री आठ ते सकाळी सातच्या कालावधीत पाच पेक्षा अधिक लोकं गोळा झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तसंच, १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून रात्री ८ ते सकाळी सात पर्यंत बगीचे, चौपाट्या यासारख्या सार्वजनिक ठिकाणं बंद राहणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.