कलेक्टर झालो असा गावभर केला गाजावाजा पोलिसाच्या मुलीशी केले लग्न, निघाला कोल्हापूरचा एक नंबरचा भामटा

0

ग्रामीण भागातील अनेक तरूण सध्या एमपीएससी, युपीएससी, आयएएस परीक्षा देत अधिकारी होत आहेत. स्वताची ग्रामीण भाषा तसेच राहणीमानावर मात करत ही तरुणाई यशाला गवसणी घालत आहे. परंतु कोल्हापुरात मात्र एका भामट्यान घरच्यांसह गावालाही कलेक्टर झालो म्हणून गंडवल आणि पोलीसाच्या मुलीशी लग्न केले.मित्रांनो सजगतेसाठी वाचा हा किस्सा.

कोल्हापूर येथील न्हाव्याचीवाडी या छोट्याशा गावात अर्जुन सकपाळ हा युवक राहतो. तो स्पर्धा परीक्षा देत होता. घरात आणि गावात त्याच चांगलच कौतुक होत. अर्जुन सकपाळ हा बीपीएड झालेला आहे. स्पर्धा परीक्षा नापास झाला ही बातमी गावात, घरात कळली तर नाचक्की होऊन टिका होईल या कारणास्तव या युवकाने ढोंग रचले. अर्जुन याने लबाडी करत मी जिल्हाधिकारी झालो असा गावभर बनाव रचला त्याने पेढेही वाटले. यानंतर गावकर्यांनी या युवकाची मिरवणूक काढत सत्कारही केला. आपल्याला गुजरातला पोस्टींग मिळाल्याच त्यान खोटच सांगितले आणि कॉलर ताठ करत रुबाबात फिरू लागला. फुकटचा मान मरातब मिळवणार्या या युवकाच्या भामटेगिरीला कोल्हापुरातील एक निवृत्त पोलीस अधिकारी बळी पडले आणि भुलून त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न धूमधडाक्यात या युवकाशी लावून दिले.

या थापाड्या अर्जुनने काही महिने गुजरातमध्ये अधिकारी असून लवकरच महाराष्ट्रात बदली होईल असे भासवले. तोतयेगिरी करत अर्जुनने एका झेरॉक्सवाल्या मित्राला हाताशी धरून रत्नागिरीत जिल्हाधिकारी म्हणून पोस्टींग झाल्याचा बनावट आदेश काढला. आप्त स्वकीयांना याची माहिती दिली. यापैकी काहिंनी त्याला शुभेच्छा देत हा आदेश व्हायरल केला. आणि या लबाडाची फसवेगिरी बाहेर आली.

व्हायरल होत असलेला हा मेसेज संबंधित अधिकारी वर्गाने पाहिला व त्याची पडताळणी केली असता अर्जुनचा बनाव समोर आला. जिल्हाधिकार्यांनी या युवकाच्या बोगस आदेशाविरूध्द पोलीसात तक्रार नोंदविली आणि त्याला अटक झाली. बेताची आर्थिक परिस्थिती असणारा हा युवक मागील सात वर्षांपासून अशी भामटेगिरी करत लोकांना फसवत आहे. लोकांनी भूलथापांना बळी न पडता शहनीशा करूनच विश्वास ठेवावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.