लसीकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची अती महत्त्वाच्या व्यक्तीशी बैठक?

0

महाराष्ट्र राज्याला सद्य परिस्थिती मध्ये २० कोटी लसीची आवश्यकता आहे. केंद्र शासनाने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची परवानगी दिल्याने ही आवश्यकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र सरकार ने सिरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सिरम चे प्रमुख अदर पुनावाला यांच्या मध्ये एक बैठक संपन्न झाल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्राला १८ वर्षाच्या वरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीची आवश्यकता आहे. आता महाराष्ट्राला सिरम कडून किती लसीचे सहकार्य मिळते हे पाहावं लागेल. मुख्यतः महाराष्ट्रात लोकांच्या लसीकरणाच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे. या दृष्टीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे सगळे जबाबदारीने काम करत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.