अंध आईच्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या शूरवीर योद्ध्याचे, मुख्यमंत्र्यांनी फोन करून केले कौतुक

0

मुंबई : आपल्या जीवाची बाजी लावून दुसऱ्याचा जीव वाचवणारे तसे फार कमीच. सध्या अशाच एका सैनिकाचे नाव देश – परदेशात चर्चेत आहे, ज्याने वांगणी स्टेशनवर आपल्या जीवाची पर्वा न करता ट्रॅकवर पडलेल्या एका अंध आईच्या पोटचा गोळा हकनाक जाण्यापासून वाचवला.

म्हणतात ना ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’. या लहानग्याच्या बाबतीत देखील असेच काहीसे घडले. रेल्वे फलाटावरून आपल्या अंध आईसोबत चाललेल्या या मुलाचा तोल गेला आणि तो रेल्वे रुळावर पडला. उंची लहान असल्याने त्याला फलाटावर चढता येईना. एवढ्यात समोरून वेगाने, त्याच्या दिशेने रेल्वे येत असलेली त्याला दिसली आणि त्याच्या जीवाची जगण्यासाठीची धडपड सुरु झाली.

दरम्यान, हे दृश्य पाहताच रेल्वे पॉईंटमन मयुर शेळके रेल वे रुळावर उतरले आणि चक्क रेल्वेच्या दिशेने त्या मुलाकडे धावत सुटले. आणि क्षणार्धात त्यांनी त्या मुलाला उचलून फलाटावर ढकललं आणि वेगाने त्यांनीही फलाटावर उडी घेतली. त्यांच्या या हिमतीचे आता समाज माध्यमांवर कौतुक होत आहे.

एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मयूर शेळके यांचे फोन करुन कौतुक केले आहे. तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल, सेंट्रल रेल्वे डीआरएम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीसुद्धा मयुर यांच्या या धाडसाचं कौतुक केलं आहे. या धाडसची पावती म्हणून मध्य रेल वेने, मयुर यांना, ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करत सन्मानित केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.