दाताची ठणक ५ मिनिटात बंद करा.

0

दाढ दुखी, दात दुखी झाल्यास कशातही लक्ष लागत नाही व आपल्याला बैचेन वाटते. दात दुखी किंवा दाढ दुखीचे प्रमुख कारण म्हणजे किड होय. दातांची योग्य निगा राखणे गरजेचे असून सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी दात ब्रश करणे गरजेचे आहे. कोणताही पदार्थ खाऊन झाल्यावर खळखळून चूळ भरणे गरजेचे असते. असे न केल्यास अन्नकण दातात अडकतात व दातांना किड लागते. नैसर्गिक दात निरोगी ठेवण सोप असून काही खबरदारी घेतल्यास ते दिर्घकाळ निरोगी राहतात.

या सर्वातून जर रात्री अपरात्री दाढ किंवा दात दुखू लागला तर चैन पडत नाही, अशावेळी डॉक्टरकडे जाण पण शक्य होत नाही. अशावेळी एखादी पेन किलर असेल तर ती घेतली जाते, परंतु ती नसेल तर दाढ किंवा दातदुखी असह्य होते. आज आपण अशाच अचानक उदभवलेल्या दाढ किंवा दातदुखीवर घरगुती रामबाण इलाज पाहणार आहोत ज्याने तुमच दुखण तर दूर होईलच पण किड दूर व्हायलाही मदत होईल. चला तर मग हा घरगुती रामबाण उपाय पाहू.

साहित्य
१) लसूण – ४पाकळ्या
२) मीठ – अर्धा चमचा
३) हळद – पाव चमचा
कृती
सर्वप्रथम लसणाचे तुकडे करून घ्या. यातील एक बारीक तुकडा हळदीत बुडवा, आता हातावर लसणाची कुडी घेऊन त्यावर मीठ पेरा. हा हळद आणि मीठ लावलेला लसूणाचा तुकडा दुखणारा दात किंवा दाढेखाली चावून धरा. यामुळे तोंडात लाळ निर्माण होईल ती गिळली तरी चालेल. साधारण ५ मिनिटात ठणकणारा दात किंवा दाढ बंद होईल. हा उपाय दिवसातून दोनदा केल्यास किडही निघून जाईल. हा उपाय पूर्णपणे निर्विष असून याचा कोणताही अपाय नाही. लसूण, मीठ, हळद अँटी फंगल असल्याने याचा वापर केला जातो.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.