करपलेला, जळलेला तवा मिनिटात करा स्वच्छ संपूर्ण काळेपणा होईल नाहिसा.

0

घरात स्वयंपाक करताना आपण बरीचशी भांडी वारंवार वापरत असतो त्यातील काही भांडी अशा वापरान काळी पडतात. पोळ्या किंवा चपात्या बनवण्याचा तवा रोज वापरला जातो. हा तवा रोज घासला तरी काळा पडतो. चपात्या बनवताना हा तवा जळून करपलेले डाग पडतात अशावेळी तारेच्या स्क्रबरने तवा घासला तरी त्याचा काळेपणा जात नाही. किचनमधील अशी काळ्या पडलेल्या भांड्यात दुसरा नंबर कढईचा लागतो. करपलेल्या या भांड्यांना परत पूर्वीसारख चकचकीत करण्याचा उपाय आज आपण पाहणार आहोत.

साहित्य :
१) लिंबू – १
२) मीठ – ४ चमचे

कृती :
सर्वप्रथम जळलेला तवा मंद गॅसवर ठेवा तो गरम हैऊ लागताच अर्धा लिंबू त्यावर ठेवा आणि जळलेल्या भागावर चोळा. लिंबाचा रस तव्यावर चोळत राहा, तवा स्लच्छ होत असल्याच दिसून येईल. साधारण अर्धा लिंबू संपून दुसरा अर्धा लिंबू तव्यावर चोळताना त्यावर एक चमचा मीठ घाला आणि त्यावर लिंबू ठेवून रस पसरवा. लिंबू व एकेक चमचा मीठ तव्यावय चोळत राहा. तव्याचा काळेपणा दूर होईल. आता गॅस बंद करा व तवा घासून घ्या. तवा गरम असताना लिंबू चोळायचा असल्याने लिंबू चिमट्यान धरून चोळा.

 

हा उपाय तुम्ही जळलेल्या, करपलेल्या कढईवरही करू शकता. भांडी जास्तच करपलेली किंवा जळलेली असतील तर ती घासण्यासाठी केमिकल वापराव लागत मात्र साधारण करपलेली भांडी या उपायान स्वच्छ, चकचकीत होतात.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.